सोबत आणि संगत
एकूण पृष्ठदृश्ये
सोबत आणि संगत
सुख की समाधान (Solution to happiness)
सुख की समाधान
विचार केला की ह्या प्रश्नांना कागदावर उतरवून बघू आपल्या शब्दांत काही उत्तर किंवा मार्ग मिळतो का?
सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपण मनापासून जी ईच्छा,अपेक्षा निर्माण करतो आणि एकेदिवशी आपल्या प्रयत्नांनी पूर्ण होते त्यावेळेस आपल्या मनातून आवाज येतो अरे व्हा आता मला सुख मिळाले किंवा मी सुखी झालो.
आपण त्या सुखासोबत काही दिवस,महिने आणि वर्ष जगत असतो.पण अचानक एकेदिवशी एखाद्या वादळाप्रमाणे परत आपल्या मनात एक नविन ईच्छा,अपेक्षा शिरकाव करते आणि आपले सुख हिरावून घेते.आपण नविन जोमाने प्रयत्न करून सुख परत मिळतो.हे चक्र चालूच राहते कारण आपल्या ईच्छा आणि अपेक्षा कधी संपत नाही.ह्या सर्व चक्रव्यूहात आपण स्वतःला अडकवून घेतो आणि स्वतःला हरवून बसतो.
आता हे तर कळले पण स्वतःला शोधायचे कसे? ह्या प्रश्नाचे पूर्ण नाही पण मी थोड्याप्रमाणात उत्तर शोधण्याच्या प्रयत्न केला आहे.
सुखाच्या मागे लागण्याऐवजी समाधान मानने कधी सोपे आहे.कारण सुख मिळवावे लागते आणि समाधान मानावे लागते. सुख शोधावे लागते पण समाधान आपल्याजवळ असते. त्यामुळे सुख शोधण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा समाधान मानने कधी चांगले. सुखासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात पण समाधानासाठी फक्त अंतरमनातून प्रयत्न करावे लागतात. सुख निर्मित करावे लागते आणि समाधान जागृत करावे लागते. असेही समाधान हे आपल्याजवळच असते त्यामुळे ते जागृत करणे पण सोपे असते.
सुखाच्या शोधात वेळ वाया घालवू नका,म्हणतात ना गेलेली वेळ परत येत नाही,सगळे विकत घेता येते पण वेळ नाही.आजच्या जगामध्ये आयुष्य हे खूप कमी झाले आहे त्याला सुख शोधण्यासाठी अजून कमी करू नका.सुखाच्या नांदामध्ये दोन घास कमी होतील आणि समाधाने दोन घास जास्त जातील. सुखाच्या मागे निराशा येते पण समाधानाच्या मागे आशा येते. तिच आशा ही अमूल्य जीवन आनंदाने जगण्याचा प्रकाश देते.सुखाच्या अंधारात राहण्यापेक्षा समाधानाच्या प्रकाशात जगा.
अजून असेही वाटते की,सुखाच्या मागे लागण्यास काही प्रमाणात आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा पण थोडाफार समावेश आहे.ते पण आपल्याला "सदा सुखी रहा" हाच आशिर्वाद देत असतात आणि आपल्या मनात सुखी राहण्याचे बिज रुजवत जातात त्यांच्यासोबतच समाज,नातेवाईक आणि इतर हे त्याला पाणी घालून अंकुरीत करतात आपण ही त्यासोबत ह्या सुखी रुपी विश्वात सुखाच्या पानांसोबत एखाद्या निरपेक्ष झाडाप्रमाणे तयार होत असतो.
आपण घ्या सुखीरुपी पानांना सोडूया आणि नविन समाधानरुपी पाने फुलवून समाधानरुपी टवटवीत वृक्ष म्हणून जगू या.
"सुखाला नकार समाधानाला होकार"
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......
पाऊल (Step)
पाऊल
अक्षर तसे छोटे असते पण अक्षर मिळूनच शब्द, ओळ, वाक्य, परिच्छेद (Paragraph), गोष्ट, लेख आणि पुस्तक बनते. तसेच आपण आपले छोटेसे पाऊल उचलून गल्ली, रस्ता, गांव, शहर, राष्ट्र, देश आणि विश्व फिरु शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रत्यानांचे छोटेसे पाऊल उचलून स्वतः चे विश्व गाठू शकतो.
एखाद्या सुंदर लेखासाठी जसे शब्द महत्वाचे असतात तसेच आपले स्वतःचे सुंदर विश्व तयार करण्यास प्रत्यानांचे पाऊल महत्त्वाचे असतात. सुंदर लेख जसा एका दिवसामध्ये बनत नाही तसेच आपले विश्व पण एका दिवसात बनणार नाही.
आपले लहानपणच बघा पहिले आपण रांगयल्या सुरुवात करतो मग हळूहळू पाय सरळ करायला शिकतो मग हळूहळू पाय टाकल्या शिकतो आणि शेवटी आपण चालल्याला शिकतो आणि त्या क्षणापासून आपण ह्या विश्वामध्ये खऱ्याअर्थाने पाऊल टाकण्यास सुरुवात करतो.
किती विशेष आहेना, आपल्याला निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले हे माहित आहे पण आपण पाहिले पाऊल कुठे टाकले होते हे मात्र विसरलो आहे. त्यामुळे असे पाऊल टाका की हे पूर्ण विश्व तुम्हाला तुमच्या पावलांनी लक्षात ठेवेल. आज आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी निल आर्मस्ट्राँगला त्याच्या पावलांनी ओळखले जाते आणि जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत त्याचे नाव अजरामर राहणार आहे.
तसेच दुसरे उदाहरण सांगायचे झाल्यास तर थॉमस एडिसन ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला आज ते ह्या विश्वात नाही पण त्यांनी उचलेल्या पावलांचे ठसे अजून पण आपल्यासोबत आहेत. प्रत्येक लाईट, बल्प, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू अजूनही त्यांच्या पावलांच्या ठश्यांची साक्ष देतात आणि पुढेही देत राहतील.
लेख लिहतांना मला अचानक मराठी "कुटुंब" चित्रपटातील "मन शुद्ध तुझं" ह्या गाण्यातील काही कडवे आठवले.
"मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीतीकशाची पर्वा भी कुणाची"
हे गाणं एकदा नक्की एकून बघा खरंच तुम्हाला खूप छान वाटेल.
पाऊल टाकल्याशिवाय मार्ग मिळणार नाही आणि मार्गच मिळाला नाहीतर विश्व निर्माण होणार नाही. पावला पावलांनी मार्ग बनतो, मार्गांनीच विश्व बनते.
"एक पाऊल आपल्या विश्वाकडे"
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......
स्वप्न (Dream)
स्वप्न
स्वप्न म्हणजे आपण स्वतःशी केलेला पण म्हणजेच वचन असते. स्वप्न म्हणजे आपल्या मनाने आणि मेंदूने आपल्यासाठी मनमोहक,सुंदर असे तयार केलेले प्रतिबिंब असते.आपण जसे विचार आणि कृती करतो त्याप्रमाणेच स्वप्न बघत असतो.त्याचनुसार आपण निर्णय घेऊन ते पूर्ण करण्याचे प्रयास करतो. प्रयास करतांना अडचणी येतील पण खचू नका,माघार घेऊ नका.मनापासून प्रयास करा नक्कीच यश मिळेल. स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतः केलेल्या प्रयासांनी जेव्हा यश मिळते तेव्हा खरच खूप आनंद मिळतो.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हालाच लढावे लागेल कारण प्रत्येकजण स्वतःच्या स्वप्नासाठी लढत असतो. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीही तुम्हाला मदत करेल, मार्ग दाखवेल आणि मार्गदर्शन पण करेल. तुमच्या स्वप्नातील प्रतिबिंब हे तुम्हालाच माहिती असते त्यामुळे ते तुम्हालाच पूर्ण करावे लागते. तुम्हाला दिलेले वचन हे तुम्हालाच पूर्ण करावे लागेल दुसरा येऊन ते पूर्ण करणार नाही हे लक्षात घ्या.
आजच कृती करण्यास सुरुवात करा, सुरुवात हीच यशाची पाहिली पायरी आहे.
"तुमच्या डोक्यात जे विचार सुरू असतात,
त्यावरून तुम्हाला ओळखले जात नाही,
तर तुम्ही काय करता म्हणजे तुमच्या,
कृतीवरुन तुम्ही ओळखले जाता."
"स्वप्न जगण्याची आस, प्रयास जगण्याचा श्वास"
"स्वप्न सुंदर, जीवन सुंदर"
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......
आयुष्य (Life)
आयुष्य
आयुष्य जन्मापासून ते मरण्यापर्यंत चा प्रवास आहे असे म्हणतात.पण आयुष्याच्या ह्या प्रवासामध्ये वेगवेगळे उतारचढाव आणि अनुभव येतात,ह्याच उतरचढवांना "धडा" आणि अनुभवांना "गुरू" मानले तर आपला हा प्रवास निःसंकोचपणे,आनंदाने आणि मनमर्जीने पूर्ण करू शकतो.
कारण हेच उतारचढाव आपल्याला एका धड्याप्रमाणे शहाणपण आणि शिक्षण देत असतात आणि अनुभव आपल्याला गुरुप्रमाणे योग्य मार्ग दाखवता.त्यामुळेच आयुष्यात आलेल्या उतरचढवांना आणि अनुभवाला घाबरू नका.
उतरचढवांना लक्षात ठेवून तसेच अनुभवांची शिदोरी घेऊन आजपासून आयुष्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलून बघा, तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये थोडाफार तरी बदल जाणवेल.
"दृष्टिकोन योग्य आयुष्य योग्य"
आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.
लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......
तूच माझी राणी (Marathi Poem)
मी चूक, तू शिक्षा
तुच माझ्या आयुष्याची दिक्षा
मी अभ्यास, तू ध्यास
माझ्यासाठी तूच आहेस खास
मी अपूर्ण, तू पूर्ण
तूच माझे आयुष्य केले संपूर्ण
मी वाट, तू रस्ता
तुझ्यासाठी खाईल खस्ता
मी शब्द, तू अर्थ
तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ
मी पहाट, तू सकाळ
तुझ्याशिवाय वाईट माझा काळ
मी किनारा, तू होडी
तुझ्याशिवाय जीवनात नाही गोडी
मी गजल, तू उखाणा
तुला भेटण्याचा शोधतो बहाणा
मी काटा, तू फुल
तुझ्यासोबत आयुष्य झाले ब्युटीफुल
मी जमीन, तू स्वर्ग
तू माझी आहेस, हाच माझा गर्व
मी दूध, तू पाणी
तूच माझी राणी
आयफोन (Marathi Poem)
आयफोन
माझे आयफोन घ्याचे स्वप्न होते,
पण माझ्याकडे पैसे नव्हते,
घरच्यांना घेऊन द्याला सांगितले होते,
पण त्यांच्याकडे ही पुरेसे पैसे नव्हते.
माझे आयफोन घ्याचे स्वप्न होते,
ते स्वप्न जाता जात नव्हते,
मी खूप प्रत्यन केले होते,
पण प्रत्ययाला यश मिळत नव्हते.
माझे आयफोन घ्याचे स्वप्न होते,
म्हणून काम करायला सुरु केले नव्हते,
कामाचे पैसे दरमहा मिळत होते,
पण ते माझ्या खर्चाला च पुरत नव्हते.
माझे आयफोन घ्याचे स्वप्न होते,
काही केल्या पूर्ण होत नव्हते,
आई वडील आयफोन घ्यायचे नाही म्हणत होते,
पण माझे स्वप्न मला झोपू देत नव्हते.
त्यासाठी एक सोल्युशन निघाले होते,
वडिलांनी डाउन पेमेंट चे पैसे भरले होते,
EMI चे हप्ते माझ्या नावावर करून घेतले होते,
माझे आयफोन घ्यायचे स्वप्न पूर्ण झाले होते.
आयफोन वाले पण लई भारी होते,
साले मोबाईल सोबत चार्जर देत नव्हते,
आयफोन वाले वॉरंटी कार्ड देत होते,
वडील माझ्या कडून हप्ते भरण्याची गॅरन्टी घेत होते.
आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते,
आयफोन सोबत सेल्फी टाकणे चालू होते,
कोणतेच सोसिएल मीडिया सोडले नव्हते,
सगळीकडे माझ्या च सेल्फी चे चर्चे चालू होते.
माझे स्वप्न पूर्ण झाले होते,
घरच्यांना पैसे देता येत नव्हते,
म्हणून ते चिडचिड करत होते,
आता स्नॅप टाकणे पण बोर वाटत होते.
माझे स्वप्न पूर्ण झाले होते,
मोबाईला कव्हर घ्यायला जमत नव्हते,
खरं सांगू का मित्रांनो,
पैसेच उरत नव्हते.
माझे स्वप्न पूर्ण झाले होते,
आयफोनने पोट भरत नाही हे उमगले,
म्हणून माझे स्वप्न दुसऱ्याच्या,
हाती स्वाधीन करायचे ठरवले.
शेवटी एकच सल्ला,
मी तोटा खाल्ला भाऊ,
तुम्ही तोट्या मध्ये नका जाऊ.
मी आयफोन घेऊ नका, असे म्हणत नाही,
पैसे उरत नसतील, तर त्याचा उपयोग नाही.
आता पहिले आनंदाने आयुष्य जगू या,
आयफोन उद्या नाहीतर परवा घेऊ या.
.jpg)





