एकूण पृष्ठदृश्ये

पाऊल (Step)

पाऊल


 "पाऊल" हा शब्द छोटा आहे. सहजच जेव्हा मी ह्या शब्दावर विचार करत बसलो तेव्हा मला कळाले की ह्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे.चला तर मग सुरुवात ह्या शब्दाला समजून घेण्याची शाब्दीक यात्रा.

अक्षर तसे छोटे असते पण अक्षर मिळूनच शब्द, ओळ, वाक्य, परिच्छेद (Paragraph), गोष्ट, लेख आणि पुस्तक बनते. तसेच आपण आपले छोटेसे पाऊल उचलून गल्ली, रस्ता, गांव, शहर, राष्ट्र, देश आणि विश्व फिरु शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रत्यानांचे छोटेसे पाऊल उचलून स्वतः चे विश्व गाठू शकतो.

एखाद्या सुंदर लेखासाठी जसे शब्द महत्वाचे असतात तसेच आपले स्वतःचे सुंदर विश्व तयार करण्यास प्रत्यानांचे पाऊल महत्त्वाचे असतात. सुंदर लेख जसा एका दिवसामध्ये बनत नाही तसेच आपले विश्व पण एका दिवसात बनणार नाही.

आपले लहानपणच बघा पहिले आपण रांगयल्या सुरुवात करतो मग हळूहळू पाय सरळ करायला शिकतो मग हळूहळू पाय टाकल्या शिकतो आणि शेवटी आपण चालल्याला शिकतो आणि त्या क्षणापासून आपण ह्या विश्वामध्ये खऱ्याअर्थाने पाऊल टाकण्यास सुरुवात करतो.

किती विशेष आहेना, आपल्याला निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले हे माहित आहे पण आपण पाहिले पाऊल कुठे टाकले होते हे मात्र विसरलो आहे. त्यामुळे असे पाऊल टाका की हे पूर्ण विश्व तुम्हाला तुमच्या पावलांनी लक्षात ठेवेल. आज आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी निल आर्मस्ट्राँगला त्याच्या पावलांनी ओळखले जाते आणि जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत त्याचे नाव अजरामर राहणार आहे.

तसेच दुसरे उदाहरण सांगायचे झाल्यास तर थॉमस एडिसन ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला आज ते ह्या विश्वात नाही पण त्यांनी उचलेल्या पावलांचे ठसे अजून पण आपल्यासोबत आहेत. प्रत्येक लाईट, बल्प, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू अजूनही त्यांच्या पावलांच्या ठश्यांची साक्ष देतात आणि पुढेही देत राहतील.

लेख लिहतांना मला अचानक मराठी "कुटुंब" चित्रपटातील "मन शुद्ध तुझं" ह्या गाण्यातील काही कडवे आठवले.

"मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची

तू चाल पुढं तुला र गड्या भीतीकशाची पर्वा भी कुणाची"

हे गाणं एकदा नक्की एकून बघा खरंच तुम्हाला खूप छान वाटेल.

पाऊल टाकल्याशिवाय मार्ग मिळणार नाही आणि मार्गच मिळाला नाहीतर विश्व निर्माण होणार नाही. पावला पावलांनी मार्ग बनतो, मार्गांनीच विश्व बनते.

"एक पाऊल आपल्या विश्वाकडे"

आशाकरतो की, मित्रांना आणि वाचकांना हा लेख आवडला असेल.

लवकरच भेटूया, नविन विषय आणि विचारांसोबत.......

२ टिप्पण्या: