पैसा
कळत होता तेव्हा मिळत नव्हता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
मिळत होता तेव्हा पुरत नव्हता
पुरत होता तेव्हा उरत नव्हता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
उरत होता तेव्हा जतन होत नव्हता
जतन होता तेव्हा मार्गी लागत नव्हता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
मार्गी लागत होता तेव्हा वाट्याला येत नव्हता
वाट्याला येत होता तेव्हा समाधान देत नव्हता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
समाधान देत होता तेव्हा संपत नव्हता
संपत नव्हता तेव्हा वाटून दिला होता
वाटून दिला तेव्हा अडचणीला मिळत नव्हता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
अडचणीला मिळत होता तेव्हा आयुष्याचा क्षण उरला नव्हता
आयुष्याचा क्षण उरला होता तेव्हा तो तसाच उरला होता
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
शेवटी तिरडी वर जाता जाता
मनी एकच भावना रुजवत होता
का तो मी तेव्हाच खर्च केला नव्हता?
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?
पैसा माझ्यासोबत अस का करत होता?

👌👌👌
उत्तर द्याहटवा