तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने जगण्याचे श्वास दिले, मी जीवनाचे ध्यास दिले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने नाव दिले, मी आडनाव दिले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने बोलणे शिकवले, मी वागणे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने बसणे शिकवले, मी उठणे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने चालणे शिकवले, मी धावणे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने जेवणे शिकवले, मी कमवणे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने अक्षर शिकवले, मी शब्द शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने अक्षर लिहायला शिकवले,
मी साक्षर व्हायला शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने अभ्यास करणे शिकवले,
मी कामाचे ध्यास शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने संस्कार शिकवले, मी परोपकार शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने गणिताचे पाठे शिकवले,
मी आयुष्याचे गणित शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने हिशोब शिकवले, मी व्यवहार शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने हसणे शिकवले,
मी कठीण प्रसंगाचे सामने करणे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने देवपूजा करणे शिकवले,
मी कर्म हीच पूजा हे शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने सातत्य शिकवले, मी वास्तव्य शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने घरातले काम शिकवले,
मी व्यावहारिक ज्ञान शिकवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने तुझ्या प्रगतीसाठी उपास केले,
मी तुझ्या नौकरीसाठी प्रयास केले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने तुझे लग्न जमवले,
मी त्या लग्नासाठी पैसे कमवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने तुझ्या संसाराचे भांडे जमवले,
मी त्यासाठी पैसे कमवले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने तुझ्या बायकोला लेकीसारखे प्रेम दिले,
मी तिला दागदागिने करून दिले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने तुझ्या मुलांवर आजीसारखे प्रेम दिले,
मी तुझ्या मुलांना जे हवे ते आणून दिले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आईने नाळीचे संबंध जुळवले,
मी ते तिच्यासोबत निभावले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
आम्ही तुझ्यासाठी एवढे केले,
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
हे ऐकून मला असे वाटले,
आम्ही आमचे आयुष्य उगाच तुझ्यावर का खर्च केले?
शेवटी निरोप घेताना एकच सांगावेसे वाटते,
माझे प्रतिबिंब तुझ्यात न रुजवावे,
देव न करो असे क्षण तुझ्या वाटेस यावे,
आणि हेच प्रश्न तू तुझ्या मुलास न विचारावे.
जरी ही वेळ आलीस तर घाबरू नकोस,
ज्या चुका आम्ही केल्या त्या तू करू नकोस,
मुलावर खर्च कर पण स्वतःसाठी बचत कर,
तू माझ्यासाठी काय केले? हाच प्रश्न तू त्याला कर.
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
तरी तू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
( स्तवन:- प्रशंसा,एखाद्या व्यक्तीविषयी किंवा घटनेविषयी केलेले औपचारिक गुणगान. इंग्लिश शब्द: - Panegyric )

🤗👌
उत्तर द्याहटवा